news
clock

 मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्याला विविध कार्यक्रम

पिंपरी, ता. ११ - मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी (ता. १९) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कान्हे येथील साईबाबा सेवाधाम संस्थेच्या सभागृहात कार्यक्रम होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी दिली. 

सदर कार्यक्रमांमध्ये सकाळी आठ ते दहा या वेळेत भजन होईल. त्यानंतर प्रतिमा पूजन, वार्षिक सर्वसाधारण सभा, अहवाल प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा होईल. ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग उंडे (करंजगाव), ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज ठाकर (माळेगाव) व समाजसेवक नितीन घोटकुले (आढले) यांना 'मावळरत्न' पुरस्काराने गौरविण्यात येईल. डॉ. अमित वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. 

खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, नगराध्यक्षा अबोली ढोरे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे आदी उपस्थित राहणार आहेत. भसे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वावरे, सचिव रामदास पडवळ, कार्याध्यक्ष संतोष कुंभार, अॅड. सागर शेटे, नितीन अडीवळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories