शहरवासियांसाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्या उद्घाटन

शहरवासियांसाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्या उद्घाटन

 शहरवासियांसाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्या उद्घाटन 

पिंपरी, ता. २१ जुलै २०२६ -  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक महत्त्वपूर्ण लोकहिताचा उपक्रम साकारत आहे. 

उद्या बुधवारी (ता. २२) ‘महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षा’चे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली. 

आयुष्मान भारत मिशन-महाराष्ट्रचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी शहरातील खासदार, आमदार, महापालिकेचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त यांची उपस्थिती असणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू होणाऱ्या या कक्षामधून महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि आयुष्मान भारत योजनेचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना महापौर निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचारांसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कक्षाद्वारे गरजू रुग्णांना महापौर निधीतून 5,000 रुपयांपर्यंतचे तात्काळ सहाय्य, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून तब्बल 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंतची केली जाणार आहे.

महापौर वैद्यकीय सहायत्ता कक्ष कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. हा कक्ष शहरातील गरजू रुग्णांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. शहरवासियांनी महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी मनोज शिंदे – ८४१२९९५५९९ यांच्याशी संपर्क साधावा.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories