news
clock
शहरातील तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका नेहमी प्रयत्नशील राहील - महापौर रवी लांडगे

शहरातील तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका नेहमी प्रयत्नशील राहील - महापौर रवी लांडगे

शहरातील तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका नेहमी प्रयत्नशील राहील - महापौर रवी लांडगे 

महापालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या यमुनानगर-निगडी येथील कौशल्यम लाईट हाऊस प्रकल्पाला महापौरांची भेट 

पिंपरी, ता. १७ - आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या तरुणांना रोजगारासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कौशल्यम् लाईट हाऊस हा प्रकल्प राबवत आहे. असे आणखी प्रकल्प निर्माण करण्याची सध्या गरज आहे. महापौर युवा रोजगार संकल्प योजनेतूनही रोजगारनिर्मिती केली जात आहे. अशा योजनांद्वारे शहरातील तरुण-तरुणींना रोजगारक्षम बनवून रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका नेहमी प्रयत्नशील राहील, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले. 

महापालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या यमुनानगर-निगडी येथील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाला नुकतीच महापौरांनी भेट दिली. पाहणी करुन या प्रकल्पाच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. प्रशिक्षणाची गुणवत्ता, रोजगार संधी आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद याबाबत समाधान व्यक्त केले.  प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या युवकांशी संवाद साधला व त्यांच्या यशाचे कौतुक केले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक उत्तम केंदळे, अनिल घोलप, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, लाईट हाऊस कम्युनिटीजच्या सीईओ अमृता बहुलेकर, प्रकल्प प्रमुख दीपिका केडिया तसेच लखन रोकडे, अक्षय किटे, वैभव कोल्हे, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.

महापौर लांडगे म्हणाले, ''बदलत्या काळानुसार विविध शिक्षण संस्थांमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. कौशल्यम् लाईट हाऊससारख्या उपक्रमांमुळे युवका-युवतींना नोकरी मिळून स्वावलंबी होण्याची संधी मिळत आहे. भविष्यात पिंपरी-चिंचवड महापालिका अशा प्रकल्पांचा विस्तार करुन अधिकाधिक तरुणाईला रोजगारक्षम बनवेल.''

 या प्रसंगी  कौशल्यम् लाईट हाऊस प्रकल्पाद्वारे नोकरी मिळालेल्या शिवमूर्ती सोनटक्के, सुमेधा ढाके, सुमित कुंभकरण, शंकर प्रसाद, रुचा लोंढे, अक्षय माने  तसेच कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ओम सुर्वे, सचिन जाधव, प्रीती कोळेकर, आरती होलाडे  युवक-युवतींचा सत्कार महापौरांच्या हस्ते झाला. 



 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories