नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांच्या आश्वासनानंतर माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांचे उपोषण मागे
Apr 17 2026
18
नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांच्या आश्वासनानंतर माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांचे उपोषण मागे
पिंपरी, ता. १७ - सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते दूषित पाणी थेट पवना नदीत मिसळत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि हा प्रश्न तत्काळ सोडवावा या मागणीसाठी माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे सोमवारपासून (ता. १३) किवळे येथे उपोषणाला बसले होते. महापौर रवी लांडगे यांनी बुधवारी (ता. १५) भोंडवे यांची भेट घेऊन नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर भोंडवे यांनी उपोषणाची सांगता केली.
यावेळी महापौर व महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी भोंडवे आणि नागरीकांशी नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपयोयजनांबाबत चर्चा केली. महापौरांच्या हस्ते फळांचा रस घेऊन भोंडवे यांनी उपोषण सोडले. प्रशासनाने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण झाली नाहीत तर पुन्हा आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा भोंडवे यांनी दिला.