मेफेड्रोनसदृश्य अंमली पदार्थ बाळगणाऱ्या युवकाला अटक
पिंपरी, ता. ९ - मेफेड्रोनसदृश्य ५९ हजार ९०० रुपये किंमतीची एकूण ३.४९ ग्रॅमफिकट पांढऱ्या रंगाची पावडर व एक मोबाईल काळेवाडी पोलिसांनी बुधवारी (ता. ८) थेरगावमधून जप्त केली आहे. हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या २३ वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे थेरगावमध्ये कुणाल रेसिडेन्सीच्या पाठीमागे आरोपी अभिषेक चंद्रकांत सोनकांबळे (वय-२३ वर्षे, रा. बेलठिकानगर, थेरगाव) याच्याकडे पांढऱ्या रंगाची पावडर (एम. डी. सदृश्य) सापडली. बेकायदेशीररित्या हा अंमली पदार्थ त्याने जवळ बाळगला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपीविरोधात काळेवाडी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.