मेट्रो स्थानकांवरील दुकाने/स्टॉल्स भाड्याने देण्याच्या फसव्या जाहिरातींपासून सावध राहा
May 27 2026
32
मेट्रो स्थानकांवरील दुकाने/स्टॉल्स भाड्याने देण्याच्या फसव्या जाहिरातींपासून सावध राहा
पुणे, ता. २७ - पुणे मेट्रो स्थानकांवरील दुकाने/स्टॉल्स भाड्याने देण्याच्या नावाखाली काही फसव्या जाहिराती प्रसारीत होत असल्याचे मेट्रो प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा फसव्या जाहिरातींपासून नागरीकांनी सावध राहावे, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.
मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे की, पुणे मेट्रोची अधिकृत माहिती फक्त अधिकृत माध्यमांतूनच प्रसिद्ध केली जाते. मात्र, पुणे मेट्रो स्थानकांवरील दुकाने/स्टॉल्स भाड्याने देण्याच्या नावाखाली काही फसव्या जाहिराती व बनावट कागदपत्रे प्रसारित होत असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी अधिकृत स्रोतांवरुन खात्री करुन घ्यावी. नागरीकांनी अशा फसवणुकीपासून सतर्क राहावे आणि इतरांनाही जागरूक करावे, अशी महत्त्वाची सूचना मेट्रो प्रशासनाने आपल्या फेसबुक पेजद्वारे दिली आहे.