'म्हाडा'च्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांसाठी ई-लिलाव प्रक्रिया जाहीर, २० मेपासून नोंदणीला प्रारंभ
May 18 2026
34
'म्हाडा'च्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांसाठी ई-लिलाव प्रक्रिया जाहीर, २० मेपासून नोंदणीला प्रारंभ
पुणे, ता. १८ - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) जिल्ह्यातील ११ व्यवसायिक गाळे व २० कार्यालयीन गळ्यांची ई-लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहे. त्यासाठी २० मे पासून ऑनलाइन नोंदणी सुरु होणार आहे आणि २४ जून रोजी प्रत्यक्ष ऑनलाइन बोली लागणार आहे.
अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २२ जून रोजी रात्री ११.५९ पर्यंत असणार आहे. प्रत्यक्ष ऑनलाइन बोली २४ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. पात्रता, गाळ्यांचा तपशील, आरक्षण व अटी-शर्तीसाठी https://eauction.mhada.gov.in आणि https://mhada.gov.in या संकेतस्थळावर २० मेपासून माहिती उपलब्ध असणार आहे.
लिलाव प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक व पात्र व्यावसायिकांना थेट म्हाडाकडून अधिकृत कायदेशीर मालकी हक्क मिळणार आहे. या ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. यासोबतच अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्यातील अधिकृत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे. प्रत्येक गाळ्याच्या आकारानुसार आणि निश्चित केलेल्या मूळ किंमतीनुसार (Offset Price) ठरवून दिलेली अनामत रक्कम (Earnest Money Deposit - EMD) ऑनलाइन पद्धतीने भरणे अनिवार्य आहे. इच्छुकांनी सर्व अटी व नियमांचे काळजीपूर्वक वाचन करुनच आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन असे 'म्हाडा'कडून करण्यात आले आहे.