विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवशाही व्यापारी संघाकडून सन्मान
विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवशाही व्यापारी संघाकडून सन्मान
पिंपरी, ता. १८ - शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले व भीमशक्ती-शिवशक्ती-लहुशक्ती समन्वय प्रमुख गुलाबराव गरूड यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी युवराज दाखले म्हणाले, "डॉ. नीलमताई गोऱ्हे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील लढाऊ महिला नेतृत्व आहे. सलग पाच वेळा बिनविरोध निवडून येणे हा त्यांच्या कार्याचा व जनतेशी असलेल्या नात्याचा मोठा पुरावा आहे. महिलांचे प्रश्न, कामगारांचे हक्क व व्यापारी वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या विधानपरिषदेत नेहमीच आक्रमक भूमिका घेतात. नीलमताई या फक्त शिवसेनेच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. विरोधकांनाही त्यांच्या विरोधात उमेदवार देता येत नाही, हीच त्यांची खरी ताकद आहे. शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने आम्ही त्यांचे मनापासून अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो."
"डॉ. नीलमताईंनी महिला सक्षमीकरण, बचत गट चळवळ, हुंडाबळी विरोधी कायदा व व्यापारी महिलांच्या हक्कांसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी व कामगार महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाही व्यापारी संघाची महिला आघाडी अधिक जोमाने काम करेल.", असे दाखले म्हणाले. यावेळी, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, सचिन जाधव हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.