एमआयडीसी भोसरी परिसरात ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी, ता. २२ - ट्रकने स्कूटीला दिलेल्या धडकेत स्कूटीवरुन चाललेल्या एका इसमाचा ट्रकखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.२०) एमआयडीसी भोसरी परिसरात घडली आहे. आरोपीवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम रणपिसे असरे मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत उत्तम रणपिसे (वय ३५) यांनी तक्रार नोंदवली आहे. आरोपी ट्रकचालक किशोर हरीचंद्र जाधव (वय ५०, रा. चाकण) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी ट्रकचालक जाधव हा त्याच्या ताब्यातील ट्रक रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन बेदकारपणे चालवत होता. एमआयडीसी भोसरी परिसरात स्पाईन रस्त्यावर महालमाता सर्व्हिसिंग सेंटरच्या समोर त्याने उत्तम रणपिसे याच्या स्कूटीस उजव्या बाजूला धडक दिल्याने उत्तम रणपिसे हे स्कूटीसह रस्त्यावर पडले. ट्रकचे डाव्या बाजूचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांच्या मृत्यु झाला.
आरोपी ट्रकचालकावर गुरुवारी (ता. २१) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१),२८१ सह, मोटार वाहन कायदा कलम १८४,११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.