पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात

 पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात

पुणे, ता. ५ - मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार,  ज्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील निवडणुका बिनविरोध होऊन निकाल जाहीर करण्यात आले आहेत, त्या मतदारसंघांमध्ये लागू असलेली आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने संपुष्टात आली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुका-२०२६ अंतर्गत पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने संबंधित निवडणुकीचा निकाल यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे.

त्याअनुषंगाने पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories