शहरातील अवैध दारु विक्रीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
कारवाईचा तपशील पुढील प्रमाणे
१) उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीत खेड तालुक्यातील भांबोली गावात अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यात आली. अवैध दारु विक्री करणाऱ्या १९ वर्षीय विश्वजीत विपीनकमार मैलांगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी देशी दारु विक्री करत होता. पोलिसांनी छापा टाकला असता ११,६४०/- रुपये किंमतीचा माल पोलिसांच्या हाती लागला. आरोपीवर उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२) हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ४ जून रोजी माणगाव, हिंजवडी येथे घनश्याम अरखीत नायक व करणसिंग राधेश्याम सिंग यांच्याकडून ८,०००/- रुपयांच्या २०० बाटल्या देशी दारु जप्त केल्या. आरोपी या दारुची मोटारसायकलवरून विनापरवाना वाहतूक करत होते. आरोपीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ), ८३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंदेवस्ती येथे एका महिलेकडून घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये ३६ लिटर गावठी दारु जप्त केली. आरोपीने ही दारु विक्रीसाठी ठेवली होती. आरोपीवर तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेस अटक करण्यात आलेली आहे.
४) भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. आरोपी
ज्ञानेश्वर अनिरुद्ध निर्मळ याने २४९०/- रुपये किंमतीची विदेशी दारु विक्रीसाठी ठेवली होती. आरोपी हॉटेल व्यवसायाशी संबंधित आहे. आरोपीवर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५) देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मामुर्डी गावात जितेंद्र पोपटराव पवार याच्याकडून २,१६०/- रुपये किंमतीची देशी दारु जप्त करण्यात आली. आरोपी हिने ही दारु देहुरोडमधील सचिन वाईन्सकडून खरेदी केली होती. प्रकरण महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत नोंदवण्यात आले.
तपास: पो. ना./ढवळे – ८५५१०६२०१३
६) पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाटनगर येथे शिला दौलत भाट यांच्याकडून १५ लिटर क्षमता असलेल्या प्लास्टिक कॅनमधील गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपीने ही दारु विक्रीसाठी साठवलेली होती. आरोपीवर पिंपरी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७) चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंचवड रेल्वे पटरी जवळ विमल गोवर्धन कटारे या महिलेकडून ३९०/- रुपये किंमतीची गावठी दारु जप्त करण्यात आली. पोलिसांनी महिला आरोपी पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस आल्याची चाहुल लागल्यावर पळून गेली. आरोपीवर चिंचवड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.