मोशी दुर्घटना प्रकरणी कारवाईसाठी महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणांनी मनपा भवन दणाणले
मोशी दुर्घटना प्रकरणी कारवाईसाठी महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणांनी मनपा भवन दणाणले
पिंपरी, ता. १६ जुलै २०२६ - मोशी कचरा डेपो येथील अनधिकृत इमारत दुर्घटनेतील 9 कामगारांच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, पीडिताचे पुनर्वसन व SIT चौकशीच्या प्रमुख मागण्यासाठी बुधवारी (ता. १५) काँग्रेस, शिवसेना उबाठा, मनसे यांच्या वतीने संयुक्त आंदोलन करण्यात आले या दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वसाधारण सभेचे प्रवेशद्वार अडवून ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करत जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी करण्यात आली. या दुर्घटनेतील मृत कामगार बंधूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखली म्हणाले - ''मोशी येथील कचरा डेपोतील "वेस्ट टू एनर्जी" प्रकल्पातील अनधिकृत इमारत कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही "दुर्घटना" नसून प्रशासनाच्या बेजबाबदारपणा आणि भ्रष्टाचारामुळे झालेला मनुष्यवध आहे.''
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ''प्रशासनाच्या चुकांमुळे असे होणे दुर्दैवी आहे आणि अशी मानव जीवितहानी होणे अधिक दुर्देवी स्वरूपाचे आहे कारण कुटुंबाचा करता पुरुष गेल्याने कुटुंबाची मोठी हानी होत असते आणि या हानीला जबाबदार असणाऱ्यांनी त्या कुटुंबाचे नुकसान भरपाई करून द्यावी, तसेच असे प्रकार पुढे होऊ नये म्हणून उपाययोजना आणि गंभीर नियोजन करणे गरजेचे आहे झालेल्या प्रकारातील अँटोनी लारा कंपनीचे वरिष्ठ, संजय कुलकर्णी, योगेश अल्हाट, यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.''
माजी नगरसेवक मारुती भापकर म्हणाले, ''प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे झालेल्या दुर्दैवी अपघाता मध्ये मलब्याखाली अडकलेल्या प्रत्येक सहकाऱ्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, भारतीय सेनेचे जवान आणि सर्व यंत्रणांनी रात्रंदिवस जीवाची बाजी लावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. परंतु नियतीपुढे सारे प्रयत्न अपुरे ठरले मात्र झालेली चूक ही अक्षम्य असल्याने याबाबत प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत योग्य पुनर्वसन योग्य कारवाई करत प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडावी अन्यथा अधिक तीव्रतेने आंदोलन करण्यात येईल.''
काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, ''या प्रकल्पाला अनधिकृत G+2 बांधकामाची परवानगी कोणी दिली? कचऱ्याचा ढिगारा धोकादायक स्थितीत असताना काम का सुरू ठेवले? याला जबाबदार असणाऱ्या PCMC च्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा व खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे.''
आंदोलकांच्या मागण्या -
1. या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करावी
2. जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर Iसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
3. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी
4. जखमी कामगारांना तातडीने भरीव आर्थिक मदत करावी
आंदोलनात सहभागी - काँग्रेस पक्षाकडून शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी सरचिटणीस हिराचंद जाधव, जितेंद्र छाबडा, हरीश डोळस, विल्यम साळवी, राहुल शिंपले, विवेक विधाते, प्रवीण कांबळे, आलोक लाड, देवदत्त रानवडे, सूरज गायकवाड, अक्षय कसबे.
शिवसेनेकडून शहर प्रमुख चेतन पवार, रोमी संधू, कैलास नेवासकर, ज्ञानेश्वर शिंदे, अनिल सोमवंशी, पार्श्व गुरव, गणेश आहेर, दत्ताराम साळवी, नितीन घोलप, शैलेश मोरे, ऋषिकेश जाधव, रवी मांडवे, शरद जगदाळे, अमोल भालेकर, विकास एक शिंगे, प्रवीण राजपूत, कल्पना शेटे, वैशाली काटकर,वैशाली कुलथे, योगिनी मोहन, तसलीम शेख.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन चिखले - मनसे शहराध्यक्ष,सचिव रुपेश पटेकर , उपाध्यक्ष बाळा दानवले , राजु सावळे , विक्रम भोसले , नितीन सुर्यवंशी, मनोज लांडगे, आदिती चावरीया , सचिन भवार , सागर बहुले , प्रतिक कांबळे, इतर कार्यकर्ते, पदाधिकारी.