मोशी दुर्घटना बचावकार्य -
पिंपरी, ता. ८ जुलै २०२६ - मोशी कचरा डेपो परिसरातील आरसीसी कॅन्टीन व कार्यालयाची तळमजला अधिक दोन मजली (G+2 इमारत पाया खचल्याने जमिनीदोस्त झाली आहे. ही घटना दुपारच्या जेवणाच्या वेळेत घडल्याने ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, ढिगाऱ्याखालून अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांचे जिवंत असल्याचे आवाज येत असून बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस दल संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर बचावकार्य करत असून, प्रत्येक जीव सुरक्षित राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकूण १६ कर्मचारी इमारतीत होते. दोन जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. या कठीण प्रसंगी प्रभावित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी संयम बाळगावा, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.
- ढिगारा, Debris, ढिगाऱ्याखाली अडकले, Trapped Under Debris, कर्मचारी अडकले, Workers Trapped, बचावकार्य, Rescue Operation, शोधकार्य, Search Operation, अग्निशमन दल, Fire Brigade,
- आरसीसी कॅन्टीन, RCC Canteen, कार्यालय इमारत, Office Building, इमारत कोसळली, Building Collapse, G+2 Building Collapse, पाया खचला, Foundation Collapse
- मोशी, Moshi, मोशी दुर्घटना, Moshi Accident, मोशी कचरा डेपो, Moshi Garbage Depot, कचरा डेपो, Garbage Depot