मोशी कचरा डेपो दुर्घटना - ९ कामगारांचा मृत्यू
पर्यावरण विभाग व अँटोनी लारा रिन्युएबल ठेकेदार कंपनीला नोटिस देण्याचे आयुक्तांचे निर्देश
पिंपरी, ता. १३ जुलै २०२६ - मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (ता. १२) महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेचा पर्यावरण विभाग तसेच अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा ढीग 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली. या इमारतीत २२ तर इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते. या पैकी इमारतीतून पाच नागरिक सुखरुप बाहेर पडले. उर्वरित अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. यामध्ये इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले. तर या घटनेत इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या घटनेच्या सखोल चौकशी आदेश दिले आहेत. या संदर्भात आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत तत्काळ महापालिकेचा पर्यावरण विभाग व संबंधित ठेकेदार कंपनी यांना नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत.
https://pimprichinchwad.news/post/moshi-garbage-depot-building-collapse-9-workers-
- आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, Dr Vijay Suryawanshi, Municipal Commissioner, चौकशी आदेश, Inquiry Ordered, दुर्घटना चौकशी, Accident Investigation
- पर्यावरण विभाग, Environment Department, अँटोनी लारा रिन्युएबल, Antony Lara Renewable, ठेकेदार कंपनी, Contractor Company, नोटीस, Notice
- मोशी कचरा डेपो दुर्घटना, Moshi Garbage Depot Accident, मोशी, Moshi, पिंपरी चिंचवड, Pimpri Chinchwad