मोशी कचरा डेपो दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू 

पिंपरी, ता. १३ जुलै २०२६ - मोशीतील कचरा डेपो इमारत दुर्घटनेमध्ये बचावकार्य सलग ४ दिवस  सुरु होते. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते. त्यातील ९ कामगार ढिगाऱ्याखाली अडकून मरण पावले. शनिवारी (ता. ११) मध्यरात्री सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर बचावकार्य थांबले. मृतांच्या कुटुंबियांना महापालिका, अॅंटोनी कंपनी व राज्य शासनाने मदत जाहीर केली. मात्र, घरातला कर्ता माणूस गेल्याने कुटुंब पोरकी झाली त्याचं काय ?, या अपघाला जबाबदार कोण ?....हे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. 

८ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीत व इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलिस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. घटना घडल्यानंतर लागलीच पाच नागरिक स्वतः बाहेर आले होते. उर्वरित १८ नागरिकांपैकी ९ नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. तब्बल ८४ तास अविरत चाललेल्या या बचाव मोहिमेतील शोधकार्यामध्ये चौथ्या दिवशी इमारतीत अडकलेल्या ७ आणि इमारतीशेजारील ढिगाऱ्यात अडकलेला १ अशा ८ कामगारांचा  मृत्यू झाला. इमारतीत अडकलेल्या भावेश वाणी यांचा ९ जुलै रोजी मृत्यू झाला होता. बचावकार्याच्या चौथ्या दिवशी अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) तसेच राहुल गायकवाड (वय ३४, मोशी) यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत बचावकार्य सुरु असताना नेते, नगरेसवक तिथे पुढे-पुढे जाऊन फोटो काढत होते आणि काही वेळातच दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन चौकशी केल्याचे सांगत समाजमाध्यमांवर फोटोंसहित जाहीर करत होते. ढिगाऱ्याखील अडकलेल्या कामगारांचे कुटुंबीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करत होते. तिथे थांबा म्हटले तिथे थांबायचे, दुसरीकडे थांबा म्हटले की तिकडे जायचे. त्यांचा जिवंत माणूस पाहण्यासाठी चार दिवस डोळे लावून कचरा डेपोच्या परिसरात ताटकळत होते.  पण, तिथे या कुटुंबियांपेक्षा लोकप्रतिनिधींनाच महत्त्व दिले जात होते..... या गोष्टी अत्यंत खेदजनक आणि चीड आणणाऱ्या आहेत. प्रशासनाच्या बेफिकीरवृत्तीमुळे या दुर्घटनेत ९ कामगारांचा जीव गेलाय.

मृत कामगारांची नावे पुढीलप्रमाणे - भावेश वाणी (३३ वर्षे), अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) तसेच राहुल गायकवाड (वय ३४, मोशी), वामन कसबे (वय ५०, मोशी) 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories