अडकलेले कामगार बाहेर निघतील तेव्हा सर्व चित्र स्पष्ट होईल - महापौर

अडकलेले कामगार बाहेर निघतील तेव्हा सर्व चित्र स्पष्ट होईल - महापौर

मोशी कचरा डेपो दुर्घटना अपडेट  -

अडकलेले कामगार बाहेर निघतील तेव्हा सर्व चित्र स्पष्ट होईल - महापौर 

पिंपरी, ता. ११ जुलै २०२६ - मोशीतील कचरा डेपो इमारत दुर्घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी बचावकार्य सुरु आहे. पुढच्या चार-पाच तासांमध्ये अडकलेल्या कामगारांबाबचे चित्र स्पष्ट होईल. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ जणांपैकी तिघेजण जिवंत असल्याचे बचाव पथकाला दिसून आले आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत, असे महापौर रवी लांडगे यांनी शनिवारी (ता. ११) दुपारी पत्रकारांना सांगितले. 

महापौर म्हणाले, ''शेवटच्या मजला क्रश करण्याचे काम सुरु आहे. पुढील चार-पाच तासांमध्ये सर्व नागरिक आपल्याला मिळतील. अडकलेल्या आठांपैकी तिघे जण दिसले आहेत. आणखी चार-पाच जण आहेत.  दिसलेल्या तिघांच्या प्रकृतीबाबत आत्ता काही सांगता येणार नाही. ते बाहेर निघतील तेव्हा सर्व स्पष्ट होईल.''

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिडीत कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये, मृत कामगारांना  महापालिका प्रशासन प्रत्येकी १० लाख रुपये, अॅंटोनी ठेकेदाराकडून प्रत्येकी २५ लाख रुपये व राज्य शासन प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करणार आहे. अॅंटोनी कंपनी मृत कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार आहे, अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून हा कचऱ्याचा ढिगारा लवकरात लवकर कमी करावा, दुसरा एखादा प्रकल्प शहरात लवकर सुरु करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असे महापौरांनी सांगितले. 

ढासळलेल्या इमारतीची परवानगी, अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत महापौर म्हणाले, ''रेस्क्यु ऑपरेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, समिती नेमून पारदर्शकपणे या घटनेची चौकशी करावी. घटनेतून जे सत्य समोर येईल. त्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ''


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories