मोशीमध्ये शासकीय इमारतीवर कोसळाला कचऱ्याचा डोंगर, आठ ते दहा कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
Jul 08 2026
57
मोशीमध्ये शासकीय इमारतीवर कोसळाला कचऱ्याचा डोंगर, आठ ते दहा कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
पिंपरी, ता. ८ जुलै २०२६ - अतिवृष्टीमुळे मोशी कचरा डेपो येथील कचरा डोंगर बुधवारी (ता. ८) कोसळला. महानगरपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला असून या दुर्घटनेमध्ये आठ ते दहा कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अग्निशमन दलाच्या पथकाकडून आणि बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. बचावकार्य आणि सद्यस्थितीमोशी येथील घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरू असून अडकलेल्या लोकांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी रुग्णवाहिकाही पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू आहे.
सविस्तर बातमी काही वेळात -
- वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, Waste To Energy Project, महानगरपालिका, Municipal Corporation, PCMC, कर्मचारी अडकले, Workers Trapped, ढिगाऱ्याखाली अडकले
- दुर्घटना, Accident, अपघात, Disaster, अतिवृष्टी, Heavy Rainfall, मुसळधार पाऊस, Heavy Rain, पावसामुळे दुर्घटना, Rain Disaster, शासकीय इमारत, Government Building
- मोशी, Moshi, पिंपरी चिंचवड, Pimpri Chinchwad, कचरा डेपो, Garbage Depot, Moshi Garbage Depot, कचऱ्याचा डोंगर, Garbage Mountain, कचरा ढिगारा, Garbage Heap, कचरा कोसळला, Garbage Collapse,