मोशीमध्ये भारतीय व्यवस्थापन संस्थेसाठी शासनाकडून १ वार्षिक भाडेपट्ट्यावर जमीन उपलब्ध होणार
मोशीमध्ये भारतीय व्यवस्थापन संस्थेसाठी शासनाकडून १ वार्षिक भाडेपट्ट्यावर जमीन उपलब्ध होणार
पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे तब्बल २८ हेक्टर जागेत भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) नागपूरचा अत्याधुनिक शैक्षणिक व प्रशिक्षण कॅम्पस उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नाममात्र रुपये १ वार्षिक भाडेपट्ट्यावर जमीन उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. आमदार महेश लांडगे यांनी ही माहिती दिली.
आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, ''हा निर्णय म्हणजे पिंपरी-चिंचवडला एज्युकेशन हब बनविण्याच्या आपल्या संकल्पाला मिळालेली मोठी ताकद आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. उद्योगनगरी आणि उच्च शिक्षण यांच्यातील भक्कम दुवा निर्माण करून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड ही केवळ औद्योगिक नगरी नव्हे, तर शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र व्हावे, हा आमचा संकल्प आहे. IIM कॅम्पस हा त्या दिशेने टाकलेला ऐतिहासिक टप्पा आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार.''

- २८ हेक्टर जमीन, 28 Hectare Land, भाडेपट्टा योजना, Lease Policy, वार्षिक भाडेपट्टा १ रुपये, 1 Rupee Annual Lease
- महाराष्ट्र शासन, Government of Maharashtra, महसूल व वन विभाग, Revenue and Forest Department
- मोशी, Moshi, IIM नागपूर कॅम्पस, IIM Nagpur Campus, भारतीय व्यवस्थापन संस्था, Indian Institute of Management,