दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना चिंचवड येथे थांबा मिळावा यासाठी सकारात्मक चर्चा

दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना चिंचवड येथे थांबा मिळावा यासाठी सकारात्मक चर्चा

दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना चिंचवड येथे थांबा मिळावा यासाठी सकारात्मक चर्चा

मल्याळी समाजबांधवांची बैठकीत खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी चर्चा 

पिंपरी, ता. २० जुलै २०२६ - निगडी-प्राधिकरणातील केरला भवन येथे चिंचवड मल्याळी समाज कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. खासदार श्रीरंग बारणे यांनी या बैठकीला उपस्थित राहून समाजबांधवांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

बैठकीत दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना चिंचवड रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा तसेच रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी केरला समाज देहूरोड अध्यक्ष पुणे  दिलीप नायर, चिंचवड मल्याळी समाज अध्यक्ष टी. पी. विजयन, उपाध्यक्ष  सुधिर नायर, माजी नगरसेवक शिवदास पिल्ले, माजी नगरसेवक बाबू नायर, राकेश नायर,  मधुसुदेन नायर,  जॉय जोसप, नंदकुमार नायर,  रेवी नायर तसेच नायर समाजातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories