वल्लभनगरमध्ये 'एसटी'च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त एसटी चालक-वाहकांचा सन्मान
Jun 02 2026
14
वल्लभनगरमध्ये 'एसटी'च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त एसटी चालक-वाहकांचा सन्मान
पिंपरी, ता. २ - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त वल्लभनगर आगार येथे एसटी चालक व वाहकांचा सन्मान करण्यात आला. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी, कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रमुख काशिनाथ नखाते यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ''१ जून १९४८ रोजी सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेला सोमवारी (ता. १) ७८ वर्षे पूर्ण झाली. दुर्गम खेडी, आदिवासी पाडे, डोंगरदऱ्या आणि ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्याचे ऐतिहासिक कार्य एसटीने केले आहे. जिथे कोणतेही वाहन पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणीही एसटीने सेवा देत सामाजिक आणि आर्थिक विकासाचा मार्ग खुला केला. अनेक संकटांचा सामना करत प्रवाशांच्या सेवेसाठी अखंडपणे धावणाऱ्या या लालपरीमागे हजारो चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान राखण्यासाठी परिवहन मंत्री व राज्य सरकारने त्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मंजूर करणे आवश्यक आहे.''
यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सन्मानाबद्दल एसटीच्या चालक-वाहकांनी आनंद व्यक्त केला.
- कष्टकरी संघर्ष महासंघ, Kashtakari Sangharsh Mahasangh, काशिनाथ नखाते, Kashinath Nakhate
- एसटी चालक, ST Drivers, एसटी वाहक, ST Conductors, चालक-वाहक सन्मान, Driver-Conductor Felicitation
- एसटी वर्धापनदिन, ST Anniversary, ७८ वा वर्धापनदिन, 78th Anniversary,
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, MSRTC, वल्लभनगर आगार, Vallabhnagar Depot,