'एमपीएससी'ची परीक्षा देणाऱ्या दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत वा भरपाई वेळ घेण्यासाठी ५ जूनपर्यंत पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक
Jun 02 2026
20
'एमपीएससी'ची परीक्षा देणाऱ्या दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत वा भरपाई वेळ घेण्यासाठी ५ जूनपर्यंत पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक
पुणे, ता. २ - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६' मध्ये दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत अथवा भरपाई वेळ मिळवण्यासाठी ५ जूनपर्यंत पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. याबाबचे परिपत्रक आयोगाने सोमवारी (ता. १) प्रसिद्ध केले आहे.
परिपत्रकात सांगितले आहे की, लेखनिकाची मदत किंवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या उमेदवारांनी विनंती अर्ज आवश्यक कागदपत्रांसह [email protected] या ई-मेल आयडीवर ५ जूनपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. केवळ ऑनलाइन मुख्य अर्जात या सवलतीचा दावा करणे पुरेसे नसून, आयोगाची स्वतंत्र लेखी परवानगी असल्याशिवाय परीक्षा केंद्रावर ही सवलत दिली जाणार नाही.
दिव्यांग उमेदवाराने परीक्षेसाठी सोबत आणलेल्या लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता केवळ १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना प्रपत्र १ किंवा प्रपत्र २, लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि नमुना क्रमांक ११ ही कागदपत्रे ई-मेलद्वारे सादर करायची आहेत, हे अर्ज अधिकृत संकेतस्थळावर www.mpsc.gov.in उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र, अंधत्व, दोन्ही हात बाधित असलेले किंवा दोन्ही हात नसलेले शारीरिक दिव्यांगत्व आणि मेंदूचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांना नमुना क्रमांक ११ सादर करण्यापासून सूट दिली आहे.
अधिक माहितीसाठी आयोगाच्या ०२२-६९३८५९८३ या क्रमांकावर संपर्क साधवा.
- पूर्व परवानगी, Prior Permission, MPSC Notification, परीक्षा सवलत
- लेखनिक सुविधा, Scribe Facility, भरपाई वेळ, Compensatory Time, MPSC Circular,
- MPSC Combined Preliminary Exam, दिव्यांग उमेदवार, Disabled Candidates
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC Exam 2026
- एमपीएससी, MPSC, Maharashtra Public Service Commission,