चालकाच्या निष्काळजीपणामुळे एसटी स्पीडब्रेकरवर आदळून प्रवासी तरुणीचा मणका फ्रॅक्चर

चालकाच्या निष्काळजीपणामुळे एसटी स्पीडब्रेकरवर आदळून प्रवासी तरुणीचा मणका फ्रॅक्चर

चालकाच्या निष्काळजीपणामुळे एसटी स्पीडब्रेकरवर आदळून प्रवासी तरुणीचा मणका फ्रॅक्चर

पुणे, ता. ८ - चालकाच्या निष्काळजीपणामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस गतिरोधकावर आदळल्याने पाठीमागील आसनावर बसलेल्या तरुणीचा मणका फ्रॅक्चर झाला आहे आणि तिच्या मलमूत्र विसर्जनाची संवेदना हरपली आहे. ही घटना २७ मे रोजी रात्री जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खडकी रेल्वेस्थानक परिसरात घडली. निष्काळजीपणे बस हाकणाऱ्या चालकावर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, रोशन तानाजी खैरनार (वय ३६, रा. वाखारी, नाशिक) याच्यावर भारतीय न्याय संहितेसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी भावासमवेत वाकडेवाडी एसटी स्थानकातून पुणे-सटाणा बसने पिंपळगाव येथे मामाच्या घरी निघाली होती. भरधाव बस खडकी रेल्वे स्थानकासमोरील गतिरोधकावर आदळली. त्यामुळे तरुणी व तिचा भाऊ आसनावरुन उडून खाली पडले. यात तरुणीच्या डोक्याला व कमरेला मार लागला. तरुणीच्या भावाने चालकाला बस बोपोडी चौकातील खासगी रुग्णालयापाशी नेण्यास सांगितले. तिथे उपचाराची सुविधा नसल्याने तरुणीला रुग्णवाहिकेतून शिवाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारानंतर तिला घरी सोडले. 

मात्र, त्रास होत असल्याने तिला पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी तिचा मणका फ्रॅक्चर झाल्याचे, मल-मूत्र विसर्जनाची संवेदना हरपल्याचे समजले. या दुखापतीमुळे  तिला हालचाल करता येत नाही. या तरुणीने  रुग्णालयातून तक्रार दिली आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories