news
clock
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना मुंबईतून अटक, सायबर पोलिसांची कामगिरी

कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना मुंबईतून अटक, सायबर पोलिसांची कामगिरी

कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना मुंबईतून अटक, सायबर पोलिसांची कामगिरी  

पिंपरी, ता. ३ -  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. या गुन्हेगारांनी परदेशातील सायबर फसवणुकीचे कॉल सेंटरमध्ये काम केले असून ते मुंबईमध्ये नवीन कॉलसेंटर सुरु करण्यासाठी आले असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींकडून ६ मोबाईल फोन, ३ पासपोर्ट, ३ पॉस मशीन, २ लॅपटॉप, २ हार्डडिस्क, २ क्यु.आर कोड स्कॅनर, १२ शिक्के, वेगवेगळया २४ बँकेचे अकाऊंट ओपनींग किट, ५ डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखवून प्लेसमेंट व इंटर्नशीप देणाऱ्या कंपनीच्या मालकाची तब्बल  २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७.७२ रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), ३ (५) सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयात आरोपींनी सेंट्रल बँक ऑफ इंडीयाच्या खात्यातून १ लाख २५ हजार रुपये घेतले असल्याने त्याबाबत चौकशी केल्यावर हे खाते  Aarshil Industries private Limited या नावाने नवी मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास करुन पोलिस उप निरीक्षक प्रकाश कातकाडे व पथकाला नवी मुंबई येथे पाठवण्यात आले. 

या पथकाने नवी मुंबईमध्ये जाऊन तुर्भे पोलीस ठाण्याच्या मदतीने शोध घेतला असता आरोपी सुशिल भगवान जुवाटकर सापडला. दाखल गुन्ह्याबाबत  त्याच्याकडे तपास केला असता त्याने साथीदार पंकज राज कपूर, निश्चल टंकबीर बरेयली व इतर साथीदारांच्या मदतीने सेंट्रल बँक ऑफ इंडीया खाते वापरले असल्याची कबुली दिली. त्यापैकी पंकज राज कपूर, व निश्चल टंकबीर बरेयली हे त्याच्याच Aarshil Industries private Limited या कंपनीत असल्याची माहीती मिळाली.  पंकज व निश्चल यांचा शोध घेऊन  तपास केला असता त्यांनी बँकॉक व म्यानमार या देशात जाऊन सायबर फसवणुक करण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम केले असल्याचे सांगितले. तसेच आरोपी सुशिल जुवाटकर याच्या सांगण्यावरुन नवी मुंबई येथे नवीन कॉल सेंटर सुरु करण्यासाठी ते आले होते असे त्यांनी सांगितले.

या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे ६ मोबाईल फोन, ३ पासपोर्ट, ३ पॉस मशीन, २ लॅपटॉप, २ हार्डडिस्क, २ क्यु.आर कोड स्कॅनर, १२ शिक्के, वेगवेगळया २४ बँकेचे अकाऊंट ओपनींग किट, ५ डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे ६२,००,०००/- रुपये होल्ड करण्यात आले आहेत.

अटक आरोपींची नावे -

१) सुशिल भगवान जुवाटकर (वय ४२ वर्षे, व्यवसाय- रिअल इस्टेट पत्ता - नेरुळ वेस्ट, नवी मुंबई), 

२) पंकज राज कपूर (वय ३८ वर्षे, व्यवसाय नोकरी सध्या रा. नेरुळ, नवी मुंबई, मुळगाव जालंधर, पंजाब),

३) निश्चल टंकबीर बरेयली (वय २७ वर्षे, व्यवसाय नोकरी, सध्या रा. नेरुळ, नवी मुंबई, मुळगाव जिल्हा दार्जीलिंग, राज्य पश्चिम बंगाल) 

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, डॉ. शशिकांत महावरकर (सह पोलीस आयुक्त), सारंग आवाड (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे), डॉ. शिवाजी पवार (पोलीस उप आयुक्त, गुन्हे), डॉ. विशाल हिरे (सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे - १) यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, व वनिता धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहीत डोळस, प्रकाश कातकाडे व विदया पाटील, पोलीस अंमलदार दिपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, सुभाष पाटील, अतुल लोखंडे, मुकुंद वारे, किरण देवकर, श्रीकांत कबुले, विशाल निचित, सोपान बोधवड, नितेश बिचेवार, दिपाली चव्हाण, भाविका प्रधान (सर्व नेमणूक सायबर पोलीस ठाणे) यांच्या पथकाने केली आहे. आरोपी विरोधात न्यायालयीन कामकाजाच्या वेळी सरकारी अभियोक्ता सुरज मोहिते यांनी न्यायालयात बाजू मांडून आरोपींची पोलीस कोठडी रिमांड मिळवून देण्यास मदत केली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories