मुंबई-पुणे घाट विभागातील ३० रेल्वे गाड्या १० ते १७ जुलै दरम्यान रद्द

मुंबई-पुणे घाट विभागातील ३० रेल्वे गाड्या १० ते १७ जुलै दरम्यान रद्द

मुंबई-पुणे घाट विभागातील ३० रेल्वे गाड्या १० ते १७ जुलै दरम्यान रद्द 

पिंपरी, ता. १० जुलै २०२६ -  मुंबई-पुणे घाट विभागातील दुरुस्तीच्या कामांमुळे मध्य रेल्वेने  १० ते १७ जुलैदरम्यान ३० गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकूरवाडी-मंकी हिलदरम्यान रेल्वे मार्गालगत सुमारे ६० मीटर खोल दरी असल्याने भराव पुन्हा उभारणे आणि ट्रॅकला आवश्यक आधार देणे हे मोठे आव्हान ठरत आहे. सततचा पाऊस, डोंगरातून वाहणारे पाणी आणि चिखलामुळे जड यंत्रसामग्री वापरण्यातही अडचणी येत आहेत. तरीही रेल्वेची अभियंता पथके प्रतिकूल परिस्थितीतही रात्रंदिवस काम करत असल्याचे सांगण्यात आले.

लोणावळा-कर्जत घाट विभागातील दुरुस्तीची कामे आणि प्रतिकूल हवामान लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १० ते १७ जुलैदरम्यान २२ नियमित एक्स्प्रेस आणि ८ विशेष अशा एकूण ३० गाड्या तात्पुरत्या रद्द केल्या आहेत.

प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेने सांगितले आहे.  रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, हैदराबाद एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि चेन्नई सुपरफास्ट मेल यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. मात्र, या काळातही सिंहगड एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस या दोन गाड्या सुरू असल्याची माहिती पुणे रेल्वे स्टेशनच्या माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories