news
clock
महापालिका रुग्णालयांमध्येही आर्थिक गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांवर कारवाई

महापालिका रुग्णालयांमध्येही आर्थिक गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांवर कारवाई

महापालिका रुग्णालयांमध्येही आर्थिक गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांवर कारवाई 

पिंपरी, ता. ७ - नागरीक विश्वासाने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी जातात. मात्र, येथेही  रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांमध्ये महापालिका व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. प्रशासनाने महापालिकेच्या सर्व रुग्णालयांची तपासणी केली असता गैरव्यवहार समोर आले आहेत.

रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या बिलांमध्ये लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालयातील लिपिक, वॉर्डबॉय, रोखपाल व इतर अशा १० कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल  दाखल केला आहे.

आकुर्डी येथील ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या मूळ बिलावर पूर्ण रक्कम दाखविली जात असताना त्याच बिलाच्या कार्बन कॉपीवर मात्र कमी रक्कम नोंदवली जात होती. तफावतीची रक्कम रुग्णालयाचे कर्मचारी स्वतःकडे वळवत होते. सातत्याने अनेक रुग्णांकडून छोटी रक्कम जमवून नऊ लाख रुपयांचा अपहार केला आहे. नवीन भोसरी रुग्णालयात सुमारे १० लाख रुपयांचा अपहार झाला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories