सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी, ता. १५ - सोमाटणे टोलनाका परिसरात वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुरुवारी (ता. ४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस हवालदार संतोष सूर्यकांत म्हस्के यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपी महिला सोमाटणे टोलनाक्याजवळ वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करुन,  शब्द उच्चारुन सार्वजनिक ठिकाणी येणाजाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करत होती. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा, सभ्यतेचा भंग होत होता. त्यामुळे  आरोपी महिलेवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories