काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे यांची नियुक्ती

काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे यांची नियुक्ती

काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे यांची नियुक्ती 

पिंपरी, ता. २१ - काँग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तथा खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी याबाबतचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले. बनसोडे यांनी यापूर्वी शहरात वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. 

 सातत्याने सक्रिय असलेले कॉंग्रेसचे नेतृत्व अशी बनसोडे यांची शहरात ओळख आहे. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करणे यामध्ये बनसोडे अग्रेसर आहेत. शहराध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेसमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला आहे. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन शहराध्यक्ष कैलास कदम यांनी २२ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शहराध्यक्षपद रिक्त होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी नरेंद्र बनसोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत शहर संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories