३० मे रोजी पुन्हा आंदोलन व बेमुदत उपोषण करणार, मराठी समाजाचे नेते मनोज जरांगे यांची घोषणा
३० मे रोजी पुन्हा आंदोलन व बेमुदत उपोषण करणार, मराठी समाजाचे नेते मनोज जरांगे यांची घोषणा
पुणे, ता. १६ - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी ३० मे रोजी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे पुन्हा एकदा मोठे आंदोलन आणि बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा केली. मराठा समाजाची शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. शनिवारी (ता. १६) अंतरवाली सराटी येथे झालेल्या जाहीर बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
या बैठकीला राज्यभरातून मराठा समाजाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, "मुंबईत समाज एकवटला होता, त्या वेळी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मग आता आमची प्रमाणपत्रे का रोखली जात आहेत ? सरकारने २९ मेपर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करावे, सातारा, हैदराबाद आणि इतर संस्थानांचे गॅजेट अध्यादेश लागू करावेत, राज्यातील सर्व आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. तसेच आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांना महावितरण आणि औद्योगिक क्षेत्रात नोकरी देण्यासाठी अध्यादेश काढावा. यावर २९ मेपर्यंत कार्यवाही झाली नाही तर ३० मे रोजी उपोषण आणि मोठे आंदोलन करण्यात येईल."
"माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही मंत्र्यांनी एका संघटनेला दोन-दोन कोटी रुपये दिले. नेकनूर येथील सरपंचावर ग्रामपंचायत जाळल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून तो गुन्हा मागे घ्यावा.", अशी मागणी जरांगे यांनी केली.
- प्रमाणपत्रे, certificates, कुणबी प्रमाणपत्र, Kunbi certificates, गॅजेट अध्यादेश, gazette ordinance,
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Chief Minister Devendra Fadnavis,
- ३० मे २०२६, 30 May 2026, अंतरवाली सराटी, Antarwali Sarati, अंबड, Ambad
- आंदोलन, protest, बेमुदत उपोषण, indefinite hunger strike,
- : मनोज जरांगे, Manoj Jarange, मराठा समाज, Maratha community,