नवलाख उंब्रे येथे गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

नवलाख उंब्रे येथे गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

 नवलाख उंब्रे येथे गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक 

पिंपरी, ता. १९ - बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सोमवारी (ता. १८) अटक केली. त्याच्याकडून ३५८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही करवाई मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नवलाख उंब्रे येथे मोकळ्या जागेत आरोपी तेजस कैलास पडवळ (वय २५) याने ३५८ ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी बाळगाला होता. 

त्याच्याकडे गांजासह, मोबाईल असा एकूण २७,९००/- रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. आरोपी तेजसला अटक केली आहे व दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. 

आरोपींवर तळेगाव एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क) 20 (ब) (ii) (अ), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories