'NEET UG-२०२६' फेरपरीक्षा २१ जूनला होणार
पिंपरी, ता. १५ - पेपरफुटीच्या प्रकारामुळे रद्द NEET UG - २०२६ परीक्षा रद्द करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) फेरपरीक्षेची तारीख २१ जून ही जाहीर करण्यात आली आहे. फेरपरीक्षेबाबतची माहिती देशाचे शिक्षणमंत्री शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी (ता. १५ मे) पत्रकार परिषदेत दिली.
"२१ जून रोजी नीट-यूजीची फेरपरीक्षा होणार आहे. फेरपरीक्षेत कोणताही गैरव्यवहार होणार नाही. कोणत्याही प्रामाणिक विद्यार्थ्याची जागा गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळू दिली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, यावर्षी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाईल. पुढील वर्षापासून (२०२७) नीटची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.''
''ज्या विद्यार्थ्यांनी आधी (३ मे) परीक्षेसाठी अर्ज केला होता, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. एनटीए (NTA) द्वारे लवकरच सुधारित प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर जारी केले जाणार आहेत. परीक्षेची प्रवेशपत्रे १४ जूनपर्यंत सर्वांना मिळतील. नीट परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था केली जाणार आहे.
फेरपरीक्षेसाठी अतिरिक्त शुल्क नाही. रद्द झालेल्या परीक्षेचा शुल्क विद्यार्थ्यांना परत दिले जाणार. फेरपरीक्षेचा खर्च 'एनटीए' करणार आहे.'' 'एनटीए'कडून नव्या प्रश्नपत्रिकेची तयारी सुरु करण्यात आलीय. आता प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंत गोपनीयतेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी यंत्रणा कार्यरत ठेवल्या आहेत.
अधिक माहितीसाठी हेल्पलाइन : [email protected]/ ०११-४०७५९००० / ०११-६९२२७७००