news
clock
पेपरफुटी प्रकरणामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द

पेपरफुटी प्रकरणामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द

 पेपरफुटी प्रकरणामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द  

पुणे, ता. १२ - नॅशनल टेस्टिंग एजन्सीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेली नीट युजी - २०२६ परीक्षा रद्द केली आहे. ३ मे २०२६ रोजी ही परीक्षा पार पडली होती. मात्र पेपरफुटीच्या प्रकरणामुळे शेवटी ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 राजस्थान (सीकर) आणि उत्तराखंडमध्ये 'गेस पेपर' नावाचा मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळणारा प्रश्नसंच परीक्षेपूर्वी फिरत होता. या पेपरफुटीच्या गैरव्यवहाराची माहिती ७ मे २०२६ ला जाहीर झाली. त्यामुळे,  शेवटी ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून, नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. 'सीबीआय'द्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तब्बल २२ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

नीट परीक्षा रद्द झाल्यानं दिल्लीत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. युवक काँग्रेसकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी दोन-तीन वर्षे आधीपासून करत असतात. सरकारकडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जातोय, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने या प्रकरणी तपास करत आतापर्यंत १५ जणांना अटक केलीय तर ४५ जणांना ताब्यत घेतले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories