तालेरा रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा
पिंपरी, ता. १२ - आधुनिक परिचर्येच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल (Florence Nightingale) यांच्या जन्मदिनी म्हणजे १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. या दिवशी परिचारिकांनी रुग्णांसाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेचा सन्मान केला जातो.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त आज, मंगळवारी (ता. १२) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात कार्यक्रम झाला. आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रुग्णालयातील परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी, रुग्णालयाचे वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनेकर, कर्मचारी महासघांचे अविनाश तिकोटे, मेट्रन रंजना कोठावळे, सिस्टर इन्चार्ज वर्षा जानराव, प्रतिनिधी कविता कामतकर, ज्योती वैद्य, आयशा ठाकर व रुग्णालयातील परिचारिका उपस्थित होत्या.
- सिस्टर इन्चार्ज, Varsha Janrao, प्रतिनिधी, Kavita Kamatkar, Jyoti Vaidya, Ayesha Thakkar,
- क्र्तज्ञता, Tribute, पूजन, Pooja, शुभेच्छा, Best Wishes, वैद्यकीय अधिकारी, Sanjay Sonekar, कर्मचारी महासंघ, Avinash Tikote, मेट्रन, Ranjana Kothawale,
- फ्लोरेन्स नाइटिंगेल, Florence Nightingale, परिचारिका, Nurses, रुग्णसेवा, Hospital Staff,
- पिंपरी-चिंचवड, Talera Hospital, जागतिक परिचारिका दिन, International Nurses Day