news
clock
नव्या आर्थिक वर्षात एटीएम कार्ड,  क्रेडीट कार्ड, पॅन कार्ड व इनकम टॅक्सबाबतचे नियम बदणार

नव्या आर्थिक वर्षात एटीएम कार्ड, क्रेडीट कार्ड, पॅन कार्ड व इनकम टॅक्सबाबतचे नियम बदणार

नव्या आर्थिक वर्षात एटीएम कार्ड,  क्रेडीट कार्ड, पॅन कार्ड व इनकम टॅक्सबाबतचे नियम बदणार

पुणे, ता. २८ - नवीन आर्थिक वर्षाची सुरवात 1 एप्रिलपासून होत आहेत. नव्या आर्थिक वर्षात एटीएम कार्ड,  क्रेडीट कार्ड, पॅन कार्ड, इनकम टॅक्स याबाबतचे नियम बदणार आहेत. जाणून घेऊया ही महत्त्वाची माहिती. 

एटीएम कार्ड - 

1 एप्रिल 2026 पासून अनेक प्रमुख बँकांनी त्यांचे ATM आणि रोख रक्कम काढण्याच्या नियमांत बदल केले आहेत. HDFC बँकेने मेट्रो शहरांमध्ये दर महिना मोफत व्यवहारांची संख्या तीन आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच असा बदल केला आहे. बंधन बँकेनेही दरमहा केवळ पाच आर्थिक व्यवहार मोफत केले आहे, त्यानंतर, ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. पंजाब नॅशनल बँकेने काही डेबिट कार्डवरील दैनंदिन रोख रक्कम काढण्याची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत कमी केली आहे.

पॅन कार्ड - 

1 एप्रिलपासून पॅन कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्डशिवाय इतर कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. आधार कार्डसोबत जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र अशी कागदपत्रे अनिवार्य असणार आहेत. 

क्रेडीट कार्ड - 

नवीन आर्थिक वर्षात मोठ्या क्रेडिट कार्ड व्यवहारांवर आयकर विभागाकडून लक्ष ठेवले जाईल. वर्षाला 10 लाखांपेक्षा जास्त असलेला कोणताही डिजिटल खर्च किंवा 1 लाखांपेक्षा जास्त रोख भरणा आयकर विभागाला कळवणे आवश्यक असेल. नागरीकांना क्रेडिट कार्डद्वारे वापरुन कर भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न - 

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याच्या तारखांमध्ये  बदल करण्यात आले आहेत. ITR-1 आणि ITR-2 असलेल्या करदात्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येईल.  नॉन-ऑडिट ITR-3 आणि ITR-4 विभागातील करदात्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories