news
clock
नवी सांगवीत तरुणाकडून १४ किलो गांजा जप्त

नवी सांगवीत तरुणाकडून १४ किलो गांजा जप्त

नवी सांगवीत तरुणाकडून १४ किलो गांजा जप्त 

पिंपरी, ता. १६ - सांगावी पोलिसांनी बुधवारी (ता. १५) ३० वर्षीय तरुणाकडून १४ किलो गांजा जप्त केला आहे व या तरुणाला अटक केली आहे. आौंध जिल्हा रुग्णालयाजवळ पोलिसांनी त्याला पकडले. 

 सहाय्यक पोलीस उप निरीक्षक निशांत रावसाहेब काळे यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे. आरोपी गणेश कैलास चव्हाण (वय ३० वर्षे, रा. शिरुर) याला अटक केली आहे. आरोपीकडे  १४ किलो गांजा, १ होंडा शाईन मोटार सायकल व २ मोबाईल फोन असा एकूण ७ लाख ९० हजार रुपयांचा माल सापडला आहे. आरोपीने बाळगलेला  गांजा हा त्याने विनोद ज्ञानेश्वर झरे (रा. ता. दौंड) याच्याकडून विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले. या दुसऱ्या आरोपीचा तपास सुरु आहे. 

दोन्ही आरोपींवर गुरुवारी (ता. १६) सांगवी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (व) (त्त्) (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories