निगडी येथे मेट्रोच्या कामादरम्याने मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

निगडी येथे मेट्रोच्या कामादरम्याने मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

निगडी येथे मेट्रोच्या कामादरम्याने मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया 

पिंपरी, ता. २८ - निगडी येथे श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण परिसरात सुरु असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान जेसीबी यंत्राद्वारे खोदकाम करत असताना मंगळवारी (ता. २७) रात्री पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा काही काळासाठी बंद ठेवावा लागला आणि परिणामी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.

अचानक पाणीपुरवठा बंद राहिल्याने निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे, नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या विविध कामांतील निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.  भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर, स्थानिक  नगरसेविका अर्चना करांडे आणि सामाजिक कार्यकर्ते अक्षय करांडे यांनी या घटनेची  दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे संबंधित मेट्रो रेल्वे ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

 “निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान अनेक वेळा पाणी पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.” असे सचिन काळभोर व अर्चना करांडे यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी नागरीकांच्या वतीने केली आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories