निगडीत हॉटेल मॅनेजरला दगड आणि बाटलीने मारहाण; चारही आरोपी अटकेत

निगडीत हॉटेल मॅनेजरला दगड आणि बाटलीने मारहाण; चारही आरोपी अटकेत

निगडी | ११ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात हॉटेलचे गेट बंद केल्याच्या कारणावरून चौघांनी एका हॉटेल मॅनेजरला दगड आणि काचेच्या बाटलीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना थर्मॅक्स चौकाजवळील सुरभी रेस्टॉरंट अँड बारसमोर घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आत्माराम सुदाम वानखेडे (वय ५१ वर्षे, थर्मॅक्स चौक, भोसरी रोड, पुणे; मूळ राहणार लाखनवाडा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात यश शंकर पोतदार (वय २२ वर्षे, साईनाथनगर, निगडी, पुणे), भूषण अरुण शिंदे (वय २४ वर्षे, देहूरोड, पुणे), विजय अरुण शिंदे (वय २३ वर्षे, देहूरोड, पुणे) आणि तन्मय संपत झांबरे (वय २१ वर्षे, काळभोर चाळ, साईनाथनगर, निगडी, पुणे) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास निगडीतील थर्मॅक्स चौक परिसरातील सुरभी रेस्टॉरंट अँड बारसमोर घडली.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी यश पोतदार, भूषण शिंदे, विजय शिंदे आणि तन्मय झांबरे यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी आत्माराम वानखेडे यांच्याशी वाद घातला. सुरभी रेस्टॉरंट अँड बारचे गेट बंद का केले, या कारणावरून आरोपींनी त्यांना विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली.

या वादादरम्यान आरोपींनी दगड आणि काचेच्या बाटलीने आत्माराम वानखेडे यांच्या तोंडावर आणि डोक्याच्या पाठीमागील भागावर मारहाण केली. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीत वानखेडे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर आत्माराम वानखेडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२)(३) तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टमधील कलम ३ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील यश शंकर पोतदार, भूषण अरुण शिंदे, विजय अरुण शिंदे आणि तन्मय संपत झांबरे या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास निगडी पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories