निगडी-प्राधिकरणात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

निगडी-प्राधिकरणात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

  निगडी-प्राधिकरणात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले 

पिंपरी, ता. १९ - मोटारसायकलवरुन आलेल्या इसमाने महिलेच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे अंदाजे १ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना सोमवारी (ता. १८) निगडी-प्राधिकरण परिसरात रात्री ८ च्या सुमारास घडली. 

याबाबत, संबंधित महिलेने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पती व नातवासह पायी चालत जात होते. त्यांच्यासमोरुन एका काळ्या रंगाच्या मोटर सायकलवरुन दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. मोटर सायकलवर मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिककावले. या मंगळसूत्राची किंमत अंदाजे १,२५,०००/- रुपये होती. 

पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. त्यांच्यावर  निगडी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १८) भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories