बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन महिलेला मायदेशी हद्दपार

बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन महिलेला मायदेशी हद्दपार

पिंपरी-चिंचवड | ८ सप्टेंबर २०२६ : वैध पासपोर्ट आणि व्हिसाविना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन महिलेला तिच्या मायदेशी हद्दपार करण्यात आले. परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या विशेष शाखा-२ ने संबंधित महिलेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नायजेरियाला पाठवले.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक परदेशी महिला बेकायदेशीररीत्या राहत असल्याची गोपनीय माहिती परकीय नागरिक नोंदणी विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाने संबंधित महिलेची चौकशी केली.

चौकशीदरम्यान महिलेच्या पासपोर्ट आणि व्हिसाच्या प्रतींच्या आधारे ऑनलाइन डीपीएम प्रणालीवर बायोमेट्रिक पडताळणी करण्यात आली. या तपासणीत तिचे नाव गिफ्ट ओकोह (Gift Okoh) असल्याचे तसेच ती नायजेरियाची नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.

संबंधित महिला २३ सप्टेंबर २०१४ रोजी वैद्यकीय व्हिसावर भारतात आली होती. ती जयपूर, पालघर परिसरात वास्तव्यास होती. मात्र, २०२४ पासून तिच्या पासपोर्ट आणि व्हिसाची वैधता संपलेली असतानाही ती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात राहत असल्याचे चौकशीत उघड झाले.

महिलेकडे वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा अन्य आवश्यक कागदपत्रे नसल्याने तिला मायदेशी परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नायजेरियन उच्चायुक्तालयाकडून तिच्यासाठी Emergency Travel Document आणि मुंबईतील परकीय नागरिक नोंदणी कार्यालयाकडून Exit Permit प्राप्त करण्यात आले.

त्यानंतर ८ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित महिलेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तिच्या मूळ देशात, नायजेरियात हद्दपार करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त धीरज पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या अन्य परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories