फुगेवाडी विषारी दारु प्रकरणातील निर्दोष अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी युवा सनेचे निलेश हाके यांचे उपोषण
Jun 02 2026
253
फुगेवाडी विषारी दारु प्रकरणातील निर्दोष अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी युवा सनेचे निलेश हाके यांचे उपोषण
पिंपरी, ता. २ - फुगेवाडी येथील हातभट्टीच्या विषारी दारु प्रकरणामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे आणि दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान गोमाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई अन्यायकारक आहे व त्यांना सेवेत पुनर्स्थापित करावे, या मागणीसाठी युवा सेनेचे निलेश एकनाथ हाके यांनी आज, मंगळवारपासून (ता. २) बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
हे उपोषण फुगेवाडी येथील कै. बाळासाहेब ठाकरे वाचनालयापाशी सुरु केले आहे. 'दोषींना शिक्षा – निर्दोषांना न्याय' हे घोषवाक्य घेऊन हाके यांनी उपोषणाला सुरवात केली. फुगेवाडी येथील हातभट्टीच्या विषारी दारु प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी. काही निर्दोष अधिकाऱ्यांनाही या प्रकरणी निलंबित केले आहे. ही बाब म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे...अशी आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्दोष अधिकाऱ्यांच्या कामाचा पुन्हा आढावा घेऊन त्यांना सेवेत पुनर्स्थापित करावे, या प्रकरणातील सत्य बाहेर आलेच पाहिजे, असे हाके यांनी म्हटले आहे. निलेश हाके यांच्यासोबत त्यांचे सहकारीही उपोषणात सहभागी झाले आहेत.
- बेमुदत उपोषण, Indefinite Hunger Strike, उपोषण आंदोलन, Hunger Strike Protest, अतुल कानडे, Atul Kanade, राज्य उत्पादन शुल्क विभाग, State Excise Department, सत्यवान गोमाले, Satyavan Gomale,
- हातभट्टी दारू, Handia Liquor, विषारी दारू मृत्यू प्रकरण, Spurious Liquor Death Case, निलेश हाके, Nilesh Hake, युवा सेना, Yuva Sena
- फुगेवाडी विषारी दारू प्रकरण, Phugewadi Toxic Liquor Case,