पिंपरी-चिंचवड
राष्ट्रीय योगासन स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रेया जगताप हिचा महापौरांकडून सन्मान
Jun 02 2026
20
राष्ट्रीय योगासन स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रेया जगताप हिचा महापौरांकडून सन्मान
पिंपरी, ता. २ - पिंपरी-चिंचवडमधील श्रेया विकास जगताप या विद्यार्थिनीने हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सुवर्णपदक तसेच अमृतसर येथे पार पडलेल्या ओपन नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदके पटकावली. या उत्कृष्ट कामगिरीसह ‘बेस्ट योगिनी अवॉर्ड’ची श्रेया मानकरी ठरली आहे.
या यशाबद्दल श्रेयाचा सन्मान महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ''श्रेयाने मिळवलेले यश म्हणजे परीश्रम व जिद्दीचे सुवर्ण यश आहे. ही कामगिरी कौतुकास्पद व सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिला तिच्या पालकांनी दिलेले प्रोत्साहनही महत्त्वाचे आहे.'', असे महापौर म्हणाले.
यावेळी महापौरांनी श्रेयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.