news
clock
घरगुती गॅस सिलिंडरचा साठा पुरेसा उपलब्ध, अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

घरगुती गॅस सिलिंडरचा साठा पुरेसा उपलब्ध, अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

घरगुती गॅस सिलिंडरचा साठा पुरेसा उपलब्ध, अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 

पुणे, ता. १३ - घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा पुरेसा उपलब्ध असून, त्याचा पुरवठा नियमितपणे सुरु आहे. कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांना नियमितपणे गॅस सिलिंडरचा पुरवठा होत आहे. कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही. जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व गॅस एजन्सींवर सतत देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय फिरती व दक्षता पथके गठीत केली आहेत. वितरकाकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री तसेच करणे किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories