ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व अत्याचार पिडीतांसाठी पोलिस ठाण्यांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व अत्याचार पिडीतांसाठी पोलिस ठाण्यांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व अत्याचार पिडीतांसाठी पोलिस ठाण्यांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी, ता. १७ जुलै २०२६ - ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी नागरिक तसेच अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचारपीडित नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. नियुक्त नोडल अधिकारी संबंधित नागरिकांच्या तक्रारी नोंदवून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करतील. तसेच या नागरिकांना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविताना अडचणी येऊ नयेत आणि त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी नागरिक तसेच अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचारपीडित नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे विशाल लोंढे यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories