news
clock
कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्याला लागली झोप, अ क्षेत्रिय कार्यालयातील प्रकार

कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्याला लागली झोप, अ क्षेत्रिय कार्यालयातील प्रकार

  कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्याला लागली झोप, अ क्षेत्रिय कार्यालयातील प्रकार 

पिंपरी, ता. ९ - निगडी येथील अ क्षेत्रिय कार्यालयातील विद्युत विभागात कामानिमित्त नागरीक गेले असता तेथील कर्मचारी टेबलवर झोपलेले पाहायला मिळाले. त्यामुळे लांबून कामासाठी आलेल्या नागरीकांचा संताप झाला. 

सरकारी कार्यालयांतील कर्मचारी नागरीकांशी व्यवस्थित संवाद साधत नाहीत, कधी जेवणाची सुट्टी तर कधी सर्व्हर डाऊन अशा तक्रारींमुळे नागरीक नेहमी वैतागलेले असतात. त्यातच आता कामाच्या वेळात कर्मचाऱ्याचा डोळा लागल्याचे पाहायला मिळाल्याने नागरीकांमध्ये नाराजी पसरली. याबाबत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. 

कार्यालयीन वेळेत कार्यालयात झोपलेल्या  संबंधित कर्मचाऱ्यावर  दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories