जुन्या मुंबई पुणे महामार्गावर साते फाटा येथे टेम्पो चालकासह वाहून गेला

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर साते फाटा येथे टेम्पो चालकासह वाहून गेला

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर साते फाटा येथे टेम्पो चालकासह वाहून गेला 

पिंपरी, ता. ६ जुलै २०२६ -  मुसळधार पावसाने पुणे-मुंबई एक्सप्रेस वे ठप्प झाला आहे.  जुन्या मुंबई पुणे महामार्गाला नदीचे स्वरुप आले असून  महामार्गावर साते फाटे येथे पाण्यात अडकलेला एक टेम्पो चालकासह वाहून गेला आहे.  घोरावडी रेल्वे स्थानकाजवल एका खासगी बसमधील ३७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे.

 लोणावळ्यात वेदांत अकॅडमी परिसरात पीएमआरडीएच्या पीडीआरएफचे पथक दाखल झाले असून विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. लोणावळा येथील हुडको कॉलनीतील वेदांत अकॅडमी परिसरात पीएमआरडीएच्या पीडीआरएफ (PDRF) पथकाने घटनास्थळी दाखल होत पाहणी व आवश्यक मदतकार्य सुरू केले आहे. मुळशी तालुक्यातील वळकी नदीचे पाणी कोळवण खोऱ्यातील रस्त्यावरती आले आहे.

तळेगावात अनेक घरांत पाणी शिरले असून हिंदमाता भुयारी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, दरम्यान घोरवाडी ते तळेगाव दाभाडे च्या मधल्या रेल्वे रुळा खालची माती पाण्यात वाहून गेली आहे.  


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories