महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध विभागांचे संपर्क क्रमांक जाहीर

महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध विभागांचे संपर्क क्रमांक जाहीर

महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध विभागांचे संपर्क क्रमांक जाहीर 

पिंपरी, ता. ६ जुलै २०२६ - गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात सुरु असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.  हवामान विभागाने (IMD पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता ६ जुलैला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन क्रमांक जाहीर केले आहेत. 

यामध्ये, महापालिकेचा मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा संपर्क क्रमांक, क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे संपक्र क्रमांक, महापालिकेच्या महत्त्वाच्या रुग्णालयांचे संपर्क क्रमांक, सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक, झाड पडल्यास संपर्क साधाण्यासाठीचे क्रमांक  जाहीर केले आहे. 

महापौर रवी लांडगे यांनी शहरवासियांना आवाहन केले आहे की,  ''हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता सर्व नागरिकांना मनापासून विनंती आहे की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. वाहन चालवताना वेग टाळा, पाणी साचलेल्या रस्त्यांवरून जाणे टाळा, नदी-नाले, ओढे, पूल व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळा. विजेच्या खांबांपासून, तुटलेल्या तारांपासून आणि धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर ठेवा. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या. शेजारी, मित्र किंवा गरजू व्यक्ती अडचणीत असल्यास त्यांना शक्य ती मदत करा. आपले एक पाऊल सावधगिरीचे… आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षिततेचे ठरेल. जीवापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही.''


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories