news
clock

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची ३१ लाख २० हजारांची फसवणूक

पिंपरी, ता. १३ - शादी डॉट कॉम या अॅपवरुन महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिची तब्बल ३१ लाख २० हजार २५७ /- रुपयांची फसवणूक केल्याची घटना दळवीनगर-चिंचवड येथे २३ डिसेंबर २०२४ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली आहे. आरोपी विरोधात गुरुवारी (ता. १२)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश पाटील उर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे (रा. लोअर परेल, मुंबई) हा या घटनेतील आरोपी आहे. आरोपीने  शादी डॉट कॉम या अॅपवरुन फिर्यादी महिलेशी ओळख करुन लग्नाचे आमिष दाखवुन विश्वास संपादन करुन वेगवेगळया कारणासाठी पैशाची मागणी करुन प्री अॅपरुव्हल लोन, ओव्हर ड्रॉफ्ट, सॅलरी लोन व अॅपमधुन ऑनलाईन कर्ज घेण्यास भाग पाडले. त्याचे सर्व हप्ते भरण्याची जबाबदारी घेतली व त्याचे हप्ते न भरता तसेच कर्जाची रक्कम परत न करता महिलेची एकूण ३१,२०,२५७/- रुपयांची फसवणुक केली. 

आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२), माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories