news
clock
ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये २५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक

ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये २५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक

ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये २५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक

पिंपरी, ता. १७ - मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे एका इसमाची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये २५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी २०२६ ते ६ मार्च २०२६ या कालावधीत फिर्यादी मोबाईलवर इंस्टाग्राम वापरत असताना “HDFC Securities Advance Broker Account” या नावाने आलेली एक जाहिरात त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांना संबंधित व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये (C-122 HDFC Securities) सामील करण्यात आले. या ग्रुपमध्ये एका मोबाईल क्रमांकावरुन एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला HDFC Securities चा प्रतिनिधी म्हणून ओळख करून दिली. त्यानंतर फिर्यादीला शेअर ट्रेडिंग व गुंतवणुकीचे आमिष दाखवून HDFC Securities Limited मध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले.

फिर्यादीने विश्वास ठेवून एकूण २५,३०,००० रुपये रक्कम गुंतवली. मात्र त्यांना ना कोणतेही शेअर्स देण्यात आले, ना गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(८), ६६(ड) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) कांबळे करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories