पालखी सोहळ्यातील वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन

पालखी सोहळ्यातील वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन

पालखी सोहळ्यातील वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन

पुणे, ता. ४ जुलै २०२६ - श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात देहू, आळंदी ते पंढरपूर दरम्यान दोन्ही पालखी मार्गावर प्रवासी, जड वाहने मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या वाहनांतील तांत्रिक दोषांमुळे अपघात होऊ नयेत, रस्त्यात बंद पडून ती वाहतूकीस अडथळा होऊ नये, याकरिता सर्व वाहनांची तपासणी प्रादेशिक परिवहन, पुणे कार्यालयाच्या आळंदी रोड चाचणी मैदान व दिवे येथील टेस्ट ट्रॅक येथील कार्यालयात वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे.

वाहन तपासणीवेळी नोंदणी प्रमाणपत्र, कर, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र व वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती व वाहतूक परवाना मुदतीत असणे आवश्यकता आहे, ही तपासणी विनामूल्य करून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणा-या सर्व वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ  घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories