'पंढरपूर टाउन' प्रकल्पातील मलपे ओढा व वाखरी पुलाचे काम आषाढी वारीपूर्वी पूर्ण होणार

'पंढरपूर टाउन' प्रकल्पातील मलपे ओढा व वाखरी पुलाचे काम आषाढी वारीपूर्वी पूर्ण होणार

 'पंढरपूर टाउन' प्रकल्पातील मलपे ओढा व वाखरी पुलाचे काम आषाढी वारीपूर्वी पूर्ण होणार 

पुणे, ता. २१ - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरु असलेल्या 'पंढरपूर टाउन' प्रकल्पातील कामांना वेग आला आहे. मलपे ओढा व वाखरी पुलाचे काम वेगाने सुरु आहे. हे काम आषाढी वारीच्या पूर्वी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपुरातील मार्गाक्रमण विनालायास होणार आहे. 

आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या पालख्यांचा विसावा वाखारी येथे असतो. तेथून पुढे अरुंद रस्त्यांमुळे पंढरपूरमध्ये प्रवेश करताना वारकऱ्यांची गैरसोय व्हायची.  'पंढरपूर टाउन' प्रकल्पाअंतर्गत वाखरी ते थेट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे सुमारे आठ किलोमीटरचे काम केले जात आहे. यासाठी सुमारे ८३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पंढरपूर टाऊन प्रकल्पाअंतर्गत वाखरी ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत शहरांतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाचा भाग असलेल्या वाखरी पूल व मलपे ओढ्याचे काम वेगाने सुरु आहे. या रुंदीकरणामुळे वारकऱ्यांना चालण्यासाठी प्रशस्त आणि सुरक्षित स्वतंत्र मार्गिका मिळणार आहे. सणांच्या काळात पंढरपुरात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. 

याबाबत बोलताना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पंढरपूर प्रकल्प व्यवस्थापक अभिजित औटे म्हणाले, ''आषाढी वारी पंढरीत दाखल होण्याच्या आधीच हे दोन्ही काम पूर्ण होतील. उर्वरित कामांना पूर्ण होण्यास मात्र आणखी किमान वर्षभराचा वेळ लागण्याची शक्यता आहे. मलपे ओढा व वाखरी पूल ते सरगम चौक रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे.''

प्रकल्पाविषयी - 

'पंढरपूर टाउन' - प्रकल्प हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (NHAI) राबवला जाणारा एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या अंतर्गत वारकऱ्यांचा पंढरपुरातील प्रवेश सुखकर व्हावा यासाठी रस्ते चौपदरीकरण, मलपे ओढा आणि वाखरी पूल बांधणे यांसारखी कामे वेगाने केली जात आहेत.तसेच, याला जोडून राज्य सरकारने पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी सुमारे ४,१५० कोटी रुपयांच्या पंढरपूर विकास आराखडा व कॉरिडॉर प्रकल्पाला देखील नुकतीच मंजुरी दिली आहे. 

- प्रमुख वैशिष्ट्ये -  पुढील ५० वर्षांतील भाविकांच्या संख्येचा विचार करुन मंदिर परिसर, नगरप्रदक्षिणा मार्ग, आणि घाट परिसराचा विकास केला जाईल. भाविकांसाठी प्रशस्त पार्किंग, आधुनिक हेलिपॅड, आणि पालखी मुक्कामासाठी विशेष सोयी केल्या जातील. वारकऱ्यांसाठी निवारा केंद्रे, संतपीठ आणि वैद्यकीय सुविधा उभारल्या जातील. जी-प्लस-वन (G+1)कॉरिडॉर अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या इमारती दोन मजली असतील, ज्याच्या तळमजल्यावर व्यापाऱ्यांची दुकाने असतील. या विकासामुळे पंढरपुरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories