पुण्यातील पंडित नेहरु स्टेडियमचे नतूनीकरण होणार

पुण्यातील पंडित नेहरु स्टेडियमचे नतूनीकरण होणार

पुण्यातील पंडित नेहरु स्टेडियमचे नतूनीकरण होणार 

पुणे, ता. ३० - पुण्यातील लोकप्रिय अशा स्वारगेट परिसरातील पंडित नेहरु स्टेडियमचे नतूनीकरण होणार आहे. हे नूतनीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मानकांनुसार होणार आहे. स्टेडियमचे स्ट्रक्चरल ऑडीट पूर्ण झाले असून स्टेडियमच्या नूतनीकरणाचा संपूर्ण आराखडा अंतिम मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर येत्या दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या भवन रचना विभागाने दिली आहे.  

नूतनीकरणाच्या या प्रकल्पामध्ये मुख्य मैदान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची नवीन खेळपट्टी तयार केली जाणार आहे.  पॅव्हेलियनचा कायापालट होऊन तेथे प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी आसनव्यवस्था केली जाणार आहे. अद्ययावत प्रकाशयोजना केली जाईल आणि  डिजिटल धावफलक व एलईडी स्क्रीनही बसविण्यात येणार आहेत. या नूतनीकरणाच्या आराखड्याला मंजूरी मिळाली की निविदा प्रक्रिया सुरु केली जाणार आहे, असे भवन रचना विभागाचे अधिक्षक अभियंता विशाल हरिभक्त यांनी सांगितले आहे. नूतनीकरणानंतर पंडित नेहरु स्टेडियमचे सुंदर रुप शहवासियांना पाहायला मिळणार आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories